Top News

‘बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात’; शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई | निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. निवृत्त नौदल अधिकाऱ्याने व्हॉट्स अॅपवर उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र फॉरवर्ड केलं होतं. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.

आशिष शेलार यांनीही या प्रकरणावरून सरकारवर टीका केली. गुंड प्रवृत्तीचे लोक सध्या सत्तेत आहेत, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या प्रश्न महाराष्ट्राचे.. उत्तरं नेत्यांची या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना शेलारांनी आदित्य ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे.

बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात, असं म्हणत आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

वांद्रे पश्चिम हा बदनाम मतदारसंघ नसून तिथे प्रामाणिक मतदार राहतात. बॉलिवूडचे अनेक लोक तिथे राहतात मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जातो असं पत्रक हे लोक काढत नाहीत. बॉलिवूडशी संबंध आहेत असं पत्रक काढणारे वांद्रे पूर्वेला राहतात असं आशिष शेलार यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अनाकलनीय

व्यंगचित्रावरुन आता शिरुरमध्येही राजकारण तापलं; शिवसेना-राष्ट्रवादीत स्टेटस वॉर सुरु!

“देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही”

नागपूरात आता मास्क न वापरल्यास भरावा लागणार इतका दंड

“मनोरंजन करण्यासाठी रियाचं आयुष्य पणाला लावू नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या