महाराष्ट्र मुंबई

“शिवसेनेचा गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ”

मुंबई | शिवसेनेनं लोकसभेत कृषिविषयक विधेयकांना पाठिंबा दिला होता तर राज्यसभेत विरोध केला होता. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेने लोकसभेमध्ये सीएएचे समर्थन केले होते, त्यानंतर यू-टर्न घेत शिवसेनेने राज्यसभेमध्ये या विधेयकाला विरोध केला होता. आता कृषीविधेयकालाही शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला होता आणि राज्यसभेत विरोधात भाषण करून सभात्याग केला. शिवसेनेची महानगरपालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू शेम परिस्थिती आहे, असं आशिष शेलार म्हणालेत.

शिवसेनेचा गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळागोंधळ असं सगळं चाललं आहे, असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला.

दरम्यान, राज्यसभेत कृषी विधेयकांवरून प्रचंड गोंधळ झाला. कृषी विधेयकांवरून विरोधकांनी माइक तोडला, कागदपत्रे फाडली, धक्काबुक्की केली. मात्र, या विरोधाला न जुमानता सरकारने प्रचंड गदारोळातच विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करून घेतली.

महत्वाच्या बातम्या-

मराठा समाज आक्रमक; आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरात आंदोलक रस्त्यावर

मोदी सरकार पबजीवरील बॅन हटवणार?; जिओ मोठा करार करण्याच्या तयारीत

“पुण्यातील कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार”

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

“जो शेतकरी जमिनीतून सोनं उगवतो, त्याच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या