मुंबई | कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे
पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारी पासून याचचं हं. सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का, असा टोला शेलारांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
भायखळ्याला पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारी पासून याचचं हं. सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का. पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे, असं ट्विट शेलारांनी केलं आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला अवघ्या दहा लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. त्यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर सरकारने नवी नियमावली जारी केली. आता शिवजयंतीला 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने हे नवीन परिपत्रक जारी केलं आहे.
भायखळ्याला पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारी पासून याचचं हं!
सरकारचं असं आमंत्रण आलय बर का!पण खबरदार जर
जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर..
असे सरकारचे आदेश पण आलेत.त्यामुळे सांभाळा!
अजब वाटले तरी नियम पाळा!!
ठाकरे सरकार करेल,
तेच नियम आणि तेच कायदे!!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 12, 2021
थोडक्यात बातम्या-
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
…म्हणून त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!
कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवलं
हनिमूनच्या रात्री नवऱ्याचं वागणं पाहून नवरीही हैराण, प्रकार पाहून तुम्हीही चकीत व्हाल!
“मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे, त्यामुळे मला काही अडचण येत नाही”