महाराष्ट्र मुंबई

…आता महाविकास आघाडीची झोप उडवणार- आशिष शेलार

मुंबई | ग्रामपंचायत निवडणुकानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीची झोप उडेल, असं भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात गीता पठण व वंदे मातरम गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेलार बोलत होते.

एकीकडे कायम हिंदुत्वाची कास धरलेल्या शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली तर दुसरीकडे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत ठाणे भाजपतर्फे गीता पठणाची स्पर्धा ठेवण्यात आली. यावरुन खरा हिंदुत्ववादी पक्ष कोणता हे स्पष्ट झालं आहे, असा टोला शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे.

विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन केलं आहे. त्याचे प्रतिबिंब राज्यात लवकरच दिसेल, असं आशिष शेलार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन- एकनाथ खडसे

मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनची माघार; सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणा

“माझ्या शुभेच्छा फक्त त्यांनाच जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत”

वाढदिवसानिमित्त रामदास आठवलेंना गृहमंत्र्यांकडून काव्यात्मक शुभेच्छा!

“पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, मी कोल्हापूरला परत जाणार आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या