Top News महाराष्ट्र मुंबई

“हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?”

मुंबई | शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. समता नगर पोलिसांनी या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा! विवेकबुध्दी गहाण ठेवली काय?, हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

  1. दरम्यान, नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. त्यामुळे काही शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली.

महत्वाच्या बातम्या-

मी जाहीर करतो की आजपासून मी भाजप-आरएसएस सोबत आहे- मदन शर्मा

आग्र्यातल्या याच दरबारातील अपमानाचा बदला घेवून महाराजांनी…’; उदयनराजेंनी मानले आदित्यनाथ यांचे आभार

ड्रग माफियांची माहिती न देताच ड्रामा क्वीन का परत गेली?”

विधी’च्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं पुनर्विलोकन करा- सुनील गव्हाणे

अचानक अभिषेक फासावर लटकल्याचा दिसला तर…’; कंगणा राणावतचं जया बच्चन यांना प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या