बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नितेश राणेंकडे असलेली प्रगल्भता दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”

सांगली | भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात आयोजित एका कार्यक्रमामध्ये पक्षाचा आदेश मिळाल्यावर कोणाबरोबरही काम करू असं वक्तव्य केलं होतं. या कार्यक्रमावेळी एकाच व्यासपीठावर भाजप व शिवसेनेचे नेते उपस्थित होते त्यामुळे भाजप-सेनेच्या युतीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा आज सांगली मध्ये बोलताना तोंड भरून कौतुक केलं आहे. नितेश राणे यांच्याकडे असलेली प्रगल्भता शिवसेनेकडे नसल्याचा मनात त्यांनी शिवसेनेला चिमटा देखील काढल्याचं या माध्यमातून पाहायला मिळालं.

पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश जर आला तर एकत्र काम करू असं नितेश राणे यांनी म्हटल्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखील नितेश राणे यांची पाठ थोपटली पण नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरच या घटना अचानक का घडत आहेत, अशा चर्चा रंगू लागल्या असतानाच नितेश राणे जे बोलले ते त्यांची प्रगल्भता आहे आणि ही प्रगल्भता दुर्दैवाने शिवसेनेकडे नसल्याचं आशिष शेलार यांनी सांगलीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं आहे.

वेंगुर्ला येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत व भाजप आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी नितेश राणे हे माझे चांगले मित्र असल्याचं विनायक राऊत यांनी बोलून दाखवलं. तसेच यावेळी नितेश राणे यांचा त्यांनी अभिनंदन देखील केलं.

 

थोडक्यात बातम्या – 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More