बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजपवर काहीही बोला पण संघ पद्धतीवर नख लावलं तर…’, उद्धव ठाकरेंना ‘या’ नेत्याचा इशारा

मुंबई | काल मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला आहे. या दसरा मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या विषयावर आणि काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

दसरा मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाषण करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणाच्या मुद्द्यांनाही लक्ष्य करत निशाणा साधला. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे, तसेच त्यांना प्रत्युत्तरही दिलं आहे.

“भाजपवर काहीही बोला पण संघ पद्धतीला नख लावण्याचं काम केलं, तर खपवून घेतलं जाणार नाही”, अशा कडक शब्दात आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाचा निषेध केला आहे. तसेच राज्याच्या प्रमुखांनी अशी भाषा वापरल्यामुळे निषेधही व्यक्त केला आहे.

“जी भाषा तुकडे-तुकडे गँगची आहे, तीच भाषा उद्धव ठाकरे यांच्या भाषणात होती की काय?, असा त्यांचा सुर होता”, अशा शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांनी दिशा देण्याचं काम करावं पण दिशा चुकल्याने षण्मुखानंद हॉलमध्ये दशावतार सुरू होता, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच फटकारलं.

थोडक्यात बातम्या

चेन्नईच सुपर ‘किंग’! चौथ्यांदा पटकावला आयपीएलचा किताब

“बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का?”

2021 आयपीएलचा अंतिम सामना खेळत धोनीने केलाय हा भीम पराक्रम, जाणून घ्या!

फक्त 2 धावांनी हुकली चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची ऑरेंज कॅप

छोटा राशिद खान! खुद्द सचिन तेंडुलकरने व्हिडीओ शेअर करत केलं कौतूक; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More