“…म्हणून नवाब मलिक आणि ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्वांची नार्को टेस्ट करा”
मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नवाब मलिक हे तपास यंत्रणांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करताना पाहायला मिळत आहे. त्यावरच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आशिष शेलार यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी समान न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून चांगलंच वातावरण तापलं असल्याचं दिसून येत आहे.
गेले काही दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणी होत असताना पाहायला मिळत आहे. तसेच नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केले त्या यंत्रणांमधील लोकांची नार्को टेस्ट व्हायला हवी, अशा पद्धतीची मागणी आशिष शेलार यांनी केली असून आरोप करणाऱ्यांना आणि ज्यांच्यावर आरोप झालेत या दोघांनाही समान पद्धतीने राज्य सरकारने वागवायला हवं, नाहीतर सरकारमध्ये बसलेल्या इतर लोकांविषयीचा संशय बळावू शकतो, त्यामुळे आशिष शेलार यांनी नार्को टेस्टची मागणी केली आहे.
दरम्यान, राज्यपाल महोदयांसमोर गुन्हेगार, गुन्हेगारी आणि गुन्ह्याबद्दल माहिती लपवण्याची शपथ घेतली होती का?, असं म्हणत राज्यपालांनी ही बाब तपासायला पाहिजे आणि नवाब मलिक यांनी उत्तर द्यायला पाहिजे, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या –
“उद्धवजी राजीनामा द्या आणि सरकार बरखास्त करा…”
महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकला! दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय
यंदा पावसाप्रमाणे थंडीचाही कहर; राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपणार
“दिवाळीनंतर बॉम्ब फोडाच, पण आवाज येऊ द्या, नुसता धूर नका काढू”
परमबीर सिंग गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत – आशिष शेलार
Comments are closed.