मतदारांसमोर हात जोडून-झुकून जा, विरोधकांसमोर ठोकून जा- आशिष शेलार

मुंबई | हात जोडून-झुकून मतदारांसमोर जा. विश्लेषक आणि विरोधकांसमोर ठोकून जा, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. ते मुंबईत आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. 

आगामी निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही? या चर्चांना उधाण आलं असताना आशिष शेलार यांनी युतीबाबत एक स्फोटक वक्तव्य केलं.

मुंबईतील सर्वच्या सर्व ६ जागा मोदीच जिंकणार, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. त्यानंतर बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत भाष्य केलं नाही. 

दरम्यान, एकीकडे भाजपच्या नेतृत्त्वाकडून युतीची भाषा सुरु आहे, तर आशिष शेलारांसारखे नेते स्वबळाची भाषा करत आहेत, त्यामुळे भाजपमध्ये नक्की चाललंय तरी काय?, असा सवाल उपस्थित होतोय. 

महत्वाच्या बातम्या-

-कधीही दोन आकडी खासदार आले नाहीत; स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचं! 

-“…तर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तुरुंगात जातील” 

-जो भ्रष्ट उसको मोदी से कष्ट है- नरेंद्र मोदी 

जनता मोदीजी के साथ चट्टान की तरह खडी है- अमित शहा

‘हग डे’ स्पेशल: काँग्रेसनं भाजपला दिल्या ‘हग डे’च्या शुभेच्छा!

Google+ Linkedin