बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वझे बिझे वाजत गेेले, आम्हाला त्यांची भिती दाखवू नका”

मुंबई | काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानंतर विधानसभेत याचविषयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे या प्रकरणाचा तपास करत होते. याप्रकरणावरून भाजप नेत्यांनी वझेंच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर अनेक आरोप केले. यानंतर या मुद्द्यावरून विरोधक आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात विधानसभेत चांगलीच जुंपली. वझे बिझे वाजत गेेले, आम्हाला त्याची भिती दाखवू नका, आम्ही त्यांना घाबरत नाही, असं उत्तर आशिष शेलार यांनी गृहमंत्र्याना दिलं. यानंतर अनिल देशमुख देखील आक्रमक झाले.

तुमच्या अर्णवला त्यांनी आत टाकलं म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का? असा खोचक सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांना केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. गृहमंत्र्यांनी अर्णववर केलेलं वक्तव्य न पटणारं आहे. आम्हाला वाझेंची भिती दाखवू नका, असं मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, फडणवीस यांनी प्रकरणातबाबत सभागृहात विविध विषयांवर हात घातला. सचिन वाझे काळा का गोरा आम्हाला माहिती नाही. गृहमंत्री आणि रिपोर्ट यांच्यात खूप फरक आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात यावा, अशी मागणी यावेळी फडणवीस यांनी सभागृहात केली आहे.

थोडक्यात बातम्या-

महाविकास आघाडीतील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

‘या’ जिल्ह्यातील चार टोळींमधील 18 गुंडांना केलं तडीपार

प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना? – चित्रा वाघ

राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

मनसुख हिरेनचं नक्की काय झालं? संपूर्ण घटनाक्रम; वाचा सविस्तर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More