मुंबई | भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं कळतंय. गेल्या 20 दिवसांत आशिष शेलार हे चौथ्यांदा राज ठाकरे यांच्या भेटीला ‘कृष्णकुंज’वर पोहोचले.
मनसे-भाजप जवळीक वाढत असताना राज ठाकरे-शेलार यांच्यात बैठकांचे सत्र सुरु आहे. नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीची समीकरणं जुळवण्यासाठी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात अनेकदा चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे.
आशिष शेलार यांनी यापूर्वी ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बराच काळ चर्चा झाली होती.
दरम्यान, मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावर वाटचाल सुरु केल्यानं भाजपशी जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
राज ठाकरे-मिलिंद एकबोटे यांच्या भेटीवर भुजबळ म्हणाले…
“सांगितलेलं ऐकलं असतं तर आबा आज आपल्यात असते”
महत्वाच्या बातम्या-
“आपल्या मुली विश्वचषकाच्या फायनलपर्यंत गेल्या याचा आपल्याला आनंद आणि अभिमान पाहिजेच”
पुण्यातील कात्रजच्या घाटात भडकलेला वणवा सयाजी शिंदेंनी विझवला
YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुलीला विमानतळावरच रोखलं!
Comments are closed.