Top News राजकारण

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलारांचा सवाल

मुंबई | शाळा उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं लक्षात आल्यावर शाळा बंद ठेवण्यात आल्यात आहेत. या निर्णयावरून भाजपने पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवलीये.

मुंबई तसंच ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट ठाकरे सरकारवर टीका केली आहे. शाळा सुरू करण्यात सावळागोंधळ, महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?, असा सवाल शेलार यांनी केलाय.

आशिष शेलार म्हणाले, “शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच. पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही. शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? पालक, विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. भयभीत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “परीक्षा घेण्यावरुन संभ्रम. परीक्षा घेतल्या त्यात पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप. अॅडमिशवरुन गोंधळ. फी वाढीबाबत हतबलता. अभ्यासक्रमाबाबत ही प्रश्नचिन्ह. शाळा सुरू करण्यात तर सावळागोंधळ. महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?”

महत्वाच्या बातम्या-

“कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतेय; तिथे कुणीही माय-बाप उरला नाहीये!”

दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले- किशोरी पेडणेकर

“कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी पडतो, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही”

“मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीन राऊतांनी बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावं”

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने निघणाऱ्या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या