Top News राजकारण

तज्ज्ञांच्या समितीपेक्षा सचिन सावंत यांना जास्त अक्कल आहे का?; आशिष शेलारांचा टोला

मुंबई | भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसचे सचिन सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी स्वत:चेच हसे करून घेतलं असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय.

आशिष शेलार म्हणाले, मुंबई मेट्रोसाठी त्यावेळी फडणवीस सरकारने कांजुरमार्गच्या जागेचा विचार केला होता, आणि त्याचा पुरावा म्हणजे त्यावेळी श्रीमती अश्विनी भिडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहिलं होतं, असं म्हणत सावंत यांनी स्वतःचं हसं करून घेतलंय.

“हा संपूर्ण घटनाक्रम महाविकास आघाडी सरकारच्या सौनिक कमिटीच्याच अहवालात नमूद असून, कांजुरमार्ग नव्हे तर आरेचीच कशी योग्य जागा आहे, हे याच सरकारच्या समितीने सांगितलंय. त्यामुळे तज्ज्ञांच्या कमिटीपेक्षाही जास्त अक्कल सावंत यांना आहे का,” असा सवालंही शेलार यांनी केलाय.

शेलार पुढे म्हणालेत, “मुळात मुद्दा हा जागा राज्य सरकारची की केंद्र सरकारची असा नसून खाजगी व्यक्तींनी या जागेवर केलेल्या दाव्यांचा आहे. त्याचप्रमाणे, स्वत:च्याच सरकारने नेमलेल्या सौनिक कमिटीच्या अहवालावर या सरकारचा विश्वास नाही का?”

महत्त्वाच्या बातम्या-

…हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे; शिवसेनेची भाजपवर टीका

“मंत्रीपदासाठी भाजपमध्ये गेलेल्या मंडळींना शपथेची स्वप्न पडतायत”

हिवाळी अधिवेशन नागपूरातच घ्या, भाजप आमदारांची मागणी

अखेर शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर ऑनलाईन शाळांना ‘इतक्या’ दिवसांची सुट्टी जाहीर!

“राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या