शिवसेनेनं डिपॉझिट वाचवून दाखवावं; आशिष शेलारांचं आव्हान

मुंबई | गुजरात निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्याचा फाॅर्म्युला जे शोधात आहेत त्यांनी एका राज्याच्या निवडणुकीवर कशाला बोलावे?, अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. 

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच शेकडो खासदार सध्या गुजरातच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत, मग देश कोण चालवतंय’, असा सवाल आदित्य यांनी विचारला होता. 

दरम्यान, आमच्या पक्षाची पंचायत ते पार्लमेंट माणसे निवडून आली.म्हणून दिसतात..जाऊ दे! तुम्ही गच्चीवरील हाॅटेल..नाईटलाईफ वगैरे अशाआवडीच्या विषयावर बोला, असा टोलाही शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना लगावलाय.