भाजपच्या विजयाच्या जल्लोषासाठी ‘सामना’चे ढोल

मुंबई | गुजरात निवडणुकीतील विजयाचं सेलिब्रेशन म्हणून मुंबई भाजपनं सामना पथकाचे ढोल वाजवून जोरदारपणे विजयाचा जल्लोष साजरा केला.

जल्लोष साजरा करण्यासाठी ढोल बडवले जातात, ते आम्ही मुद्दामच सामना ढोल पथकाचे मागवले. गुजरातमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यामुळे भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल, असा टोला शेलार यांनी लगावला.

दुसऱ्याच्या घरी पोरगं झालं तरी हे आनंद साजरा करतात. काँग्रेसला मत मिळाल्यावर ज्यांना आनंद होतो त्यांचा अंत काँग्रेसच्याच रस्त्यावर होईल, असंही ते म्हणाले.