बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इमारतींंना बांधकाम परवाने आणि भोगवटा प्रमाणपत्रे पण मंत्रालयातून देणार का?”

मुंबई | महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने सत्ताधाऱ्यांवर टीकेची झो़ड सुरूच ठेवली आहे. अशातच भाजप नेते आणि आमदार आशिष शेलारांनी आता नवीन मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरु केलेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी बांद्रा येथील असे एक प्रकरण आज सभागृहासमोर उघड केलं.

पाली हिल येथील कृष्णा-अजय डेव्हलपर्स यांच्या इमारतीचे बांधकाम करताना फनेल झोनच्या नियमापेक्षा 10 फूट जास्त उंच करण्यात आले होते. त्याला एअरपोर्ट अँथाँरिटीने विरोध केल्यामुळे मुंबई महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र नाकारलं होतं. मात्र याबाबत मंत्रालयात नगर विकास विभागाने सुनावणी घेऊन त्या विकासकामाला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलं. अशा प्रकारे महापालिकेने अनधिकृत ठरवलेल्या इमारतींंना आता बांधकाम परवाने आणि भोगवटा प्रमाणपत्रे पण मंत्रालयातून देणार का? महापालिकेच्या अधिकारावर गदा आणणार का? असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे.

एकीकडे पर्यावरण मंत्री सांगतात की, मुंबईच्या विकासासाठी एकच प्राधिकरण असायला हवं, जर महापालिकेचे अधिकार अबाधित राहून असे प्राधिकरण होणार असेल तर आमचा विरोध नाही. पण एकिकडे असं सांगितले जात असलं तरी मंत्रालयातून कृती मात्र उलटी केली जात आहे. यावर तोडगा काढायला हवा, असं म्हणत आशिष शेलारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना भाजप आमदार अॅॅड आशिष शेलार यांनी 21 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीसाठी विविध तरतूदी दिसतात मग मुख्यमंत्र्यांच्या मुंबईसाठी तरतूदी का नाही? असा खोचक सवालही ठाकरे सरकारला विचारला.

थोडक्यात बातम्या-

इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, ‘खेळभावना असावी तर अशी’, पाहा व्हिडिओ

‘त्या’ महिलेने स्वत: अंगातील झगा काढला; अनिल देशमुखांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात नेमकं काय घडलं!

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!

देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

Renault Kiger गाडीचा बाजारात धुमाकूळ; पहिल्याच दिवशी झाली विक्रमी विक्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More