“मी ठरवेन तेच धोरण आणि मी लावेन तेच तोरण, या अहंकारात मंत्रिमंडळ”
मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे राठोड यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. मात्र संजय राठोड पोहरादेवी येथे येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी केली होती. आता याच विषयावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत.
आशिष शेलारांनी याबाबत एक ट्विट करत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील चौकशी कधी पुर्ण होणार? असा सवाल सरकारला विचारला आहे. सोबतच, मी ठरवेन तेच धोरण आणि मी लावेन तेच तोरण या अहंकारात राज्य मंत्रिमंडळ आहे! असं म्हणत शेलारांनी सरकारला टोला लगावला आहे.
या प्रकरणातील फोटोज, ऑडिओ क्लिप्स, कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल होत आहेत, याशिवाय तरुणीचा मेडिकल रिपोर्ट गुन्हा झाला असल्याचं दर्शवत आहे, इतके पुरावे असूनही सरकार कारवाईचे आदेश का देत नाही? सरकारसाठी कायद्याची किंमत शून्य आहे का? असे सवाल शेलारांनी यावेळी विचारले आहेत.
दरम्यान, काल संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर, या प्रकरणातील आणखी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणातील गबरु नावाचा हा नवीन व्यक्ती कोण आहे?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मी ठरवेन तेच धोरण आणि मी लावेन तेच तोरण या अहंकारात राज्य मंत्रीमंडळ!@BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/XjbGgPmACz
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 23, 2021
थोडक्यात बातम्या-
जगातल्या ‘या’ सर्वात मोठ्या स्टेडियमला दिलं जाणार नरेंद्र मोदींचं नाव!
‘…पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरुवर कारवाई का नाही?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
कुत्रा चावल्याच्या रागातून तरूणाने कुत्र्याचाच घेतला जीव!
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
Comments are closed.