बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिंदुंच्या सणाला परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का?”

मुंबई | आंतकवादी ड्रोन किंवा इतर माध्यमांनी हल्ले करू शकतात असं कारण देत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 10 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत जमावबंदीचे आदेश दिले. 10 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत 144 कलम लागू केलं, यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

राम भक्तांवर ठाकरे सरकारचा काय राग आहे कळत नाही, असा टोला आशिष शेलारांनी (Ashish Shelar) लगावला आहे. जेव्हा जेव्हा हिंदू सण येतात तेव्हा परवानगी देताना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या हाताला लकवा मारतो का?, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

गुढीपाडवा, नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. तसेच रामजन्माला देखील मिरवणुका निघतात. मात्र, याच्या परवानगीची स्पष्टता नाही. हिंदू सण म्हटलं की यांच्या हाताला लकवा मारतो. शिवसेनेने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे अवाहन देखील आशिष शेलार यांनी केलं आहे.

दरम्यान, शिवसेना (Shivsena) कार्यक्रम करतात तेव्हा कोणतेही कारणं येत नाहीत. हॅप्पी स्ट्रीट आणि वांद्रे वंडरलँड चालणार पण गुढीपाडवा नाही हे आम्ही चालू देणार नाही, असा टोला देखील आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘बहुतेक सदाभाऊंच्याच #*# आग लागली असावी’; पवारांवरील टीकेनंतर मिटकरी भडकले

भाजपसोबतच्या मैत्रीवर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

“शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं, त्यांचं नाव आगलावे करा”

Weather Update: येत्या पाच दिवसांत ‘या’ भागात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनचं कोट्यवधींचं नुकसान, ‘ही’ आकडेवारी समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More