बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘..तरी ठाकरे सरकारच्या अहंकारापुढे झुकणार नाही’; आशिष शेलार आक्रमक

मुंबई | मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) व भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यातील बीबीडी चाळ स्फोट प्रकरणापासून सुरू असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर शेलारही आक्रमक झाले आहेत.

किशोरी पेडणेकरांनी तक्रार दाखल करताच आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) यांना पत्र लिहिलं आहे. वस्तुस्थितीमध्ये फेरफार करत सत्ताधारी पक्षाच्या घटकांकडून माझ्यावर खोटा खटला भरण्याच्या दबावाला विरोध केला असल्याचं शेलार म्हणाले आहेत.

तक्रार दाखल झाल्यानंतर आशिष शेलार यांनी एक व्हिडीओ जारी करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘खोट्या तक्रारी, गुन्हे दाखल करून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न जरी केलात तरी ठाकरे सरकारच्या अशा अहंकारापुढे झुकणार नाही,’ असा इशारा शेलारांनी दिला आहे.

सत्तेचा आणि पोलीसांचा दुरूपयोग करून माझ्यावर खोट्या केसेस केल्या, असा घणाघात शेलारांनी केला आहे. तर जनतेच्या प्रश्नांचा संघर्ष अधिक जोमाने करू. सरकारच्या नाकर्तेपणाविरूद्धचा संघर्ष मी अजून कडवा करीन असा इशाराही आशिष शेलारांनी दिला आहे.

 

खोट्या तक्रारी, गुन्हे दाखल करुन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न जरी केलात, तरी ठाकरे सरकारच्या अशा अहंकारासमोर झुकणार नाही, दबणार नाही.. जनतेच्या प्रश्नांचा संघर्ष अधिक जोमाने करु! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/lM94h8RZcs

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 8, 2021

 

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांनी घेतली प्रियंका गांधींची भेट; तासभर चर्चेनंतर राऊत म्हणाले…

दिलासादायक! पहिला Omicron बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाला

“आमचं हेलिकाॅप्टर असंच ढगामध्ये सापडलं होतं…”; शरद पवारांनी सांगितला किस्सा

अपघात की घातपात? निवृत्त ब्रिगेडर हेमंत महाजन म्हणतात, “चीनने हा…”

राज्याचं टेन्शन वाढलं! Omicron रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More