पुणे | मुख्यमंत्र्यांना फक्त बॉलीवूड मुंबईच्या बाहेर जाणार नाही याची काळजी आहे, तर पुत्राला पब आणि बारची चिंता आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील शाळा उघण्याच्या संदर्भात सरकारने आमच्याशी चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे. चर्चा केल्यानंतर भाजपची काय भूमिका आहे हे आम्ही जाहीर करू. मात्र करोनाची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा हा राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे, असं शेलार म्हणाले.
जर आमची सत्ता असती तर आम्ही सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला असता. मात्र हे सरकार असे काही करताना दिसत नाही, असं शेलार म्हणाले.
पब बार उघडण्यापूर्वी मंदिरं उघडण्याची मागणी चुकीची नाही. नियम घालून ते जर उघडलं जाऊ शकतं. तर मंदिरं नियम घालून का नाही मंदिरं उघडली गेली नाही?, असा सवाल आशिष शेलारांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या-
मनसे नेत्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!
भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील
“जोपर्यंत वीज बिल 50 टक्के माफ होत नाही, तोपर्यंत ती भरू नका”
कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड; भारती सिंह आणि पती हर्ष ताब्यात
“…त्यामुळे मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती”