महाराष्ट्र सातारा

…नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे- आशिष शेलार

सिंधुदुर्ग | शिवसेनासोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसच्या मंत्र्याने आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका विभाजनाची मागणी केली आहे. मुंबईला विभाजीत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती आहे, असा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केलाय.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. यावरून आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे. ते सावंतवाडीत माध्यमांशी बोलत होते.

जपला मुंबईचं विभाजन, त्रिभाजन या कुठल्याही गोष्टी मान्य नाहीत. अशा पद्धतीने मुंबईचं विभाजन काँग्रेस आणि त्याला मुक संमती दिलेल्या शिवसेनेचा मुंबई तोडण्याचा प्रयत्न असेल तर जनता त्यांना स्वीकारणार नाही. भाजप या दोघांच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

शिवसेनेची भूमिका ताठर असेल संयुक्त मुंबई, एकसंघ मुंबई अशी असेल तर त्यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले पाहीजे, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे. मात्र या दोन्ही गोष्टी न करता केवळ धुळफेक करण्याचं काम शिवसेना करतेय, असं शेलार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“ये पब्लिक सब जाणती है, सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा”

‘सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच’; अब्दुल सत्तारांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

“पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो”

“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला”

मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या