महाराष्ट्र मुंबई

“मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण”

मुंबई | मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजरात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दिवसेंदिवस शिवसेनेचा पायाखालचा मतदारवर्ग घसरत चालल्याने कृत्रिम वलय तयार केलं जात आहे. शिवसेनेने आत्मविश्वास गमावला, म्हणून त्यांना खमंग ढोकळा आठवला, अशी टीका आशिष शेलार यांनी केलीये.

जिलबी अने फाफडा, जनाब सेनेला द्या झापडा, अशी भूमिका गुजराती मुंबईकरांनी आता घेतली आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

रोटन टाटा असा उल्लेख करत सुब्रमण्यम स्वामी यांची रतन टाटांवर टीका, म्हणाले…

‘या’ तारखेपासून देशात कोरोना लसीकरणाला प्रारंभ!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का; क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा

रोहित पवारांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र; केली ‘ही’ विनंती

…तर राज्य सरकार गरिबांना मोफत लस देणार- राजेश टाेपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या