मुंबई | शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या कलाकारांची चौकशी करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजप नेते आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे.
शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार?, असं म्हणत आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे.
कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर..आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी, असं ट्विट आशिष शेलारांनी केलं आहे.
या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? प्रश्न विचारायची वेळ आता आलेली आहे, असंही आशिष शेलार म्हणाले.
कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर..
आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार
आणि
भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार?
वा रे वा!
महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 8, 2021
थोडक्यात बातम्या-
‘ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं’; आव्हाडांचा अमित शहांना टोल
“भारतरत्नांची चौकशी करणारे असे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत”
…तर माझ्या बापाची औलाद सांगणार नाही; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा
शेतात पत्नीसोबत शरीरसुखाचा आनंद घेतला, त्यानंतर उचललं काळजाचा थरकाप उडवणारं पाऊल
‘या’ SUV ने विक्रीबाबतचे मोडले सर्व रेकॉर्ड, 4 महिन्यात इतक्या हजार गाड्या बुक