Top News

‘आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि…’; आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई | राज्यातील मंदिरं सुरू करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. भाजप, एमआयएम, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह धार्मिक संघटनांनीही मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

प्राचीन दंतकथेतील आटपाट नगरीच्या कथेचा आधार घेत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट… महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोनासोबत पावसाने थैमान घातलेले… शेती, घरे, गुरे सारे काही उद्ध्वस्त झालेले… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर अनावर… तेव्हा नगराचे राजे ‘बॉलिवूड’ कसे वाचवायचे यावर चिंतातूर झालेले… मदतीसाठी राजा येतच नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता आता मंदिरे तरी उघडा असा अर्जव करतेय… त्यावेळी नगरात कुणीही मागणी केलेली नसताना पब, बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून ‘नाईट लाइफ’ची काळजी राजपुत्र करत आहेत…दुर्देवी चित्रं… ‘महाराष्ट्र नगरी आणि चौपट राजा’.., असं ट्विट करत शेलार यांनी सरकारवर टीका केलीये.

महत्वाच्या बातम्या-

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत तेजस ठाकरेंनी शोधली माशाची नवी प्रजाती

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आपल्यापेक्षा बरे- राहुल गांधी

संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या