बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भास्कर जाधवांचा अरेरावीचा प्रकार मालकाला खूश करण्यासाठी”

मुंबई | पावसामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत असलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महिलेसोबत गैरवर्तन केलं. यानंतर या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावरून विरोधकांनी शिवसेनेवर सडकून टीका केलीये.

भाजपकडून भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. आता या प्रकरणावर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे.

भास्कर जाधव आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असा प्रकार करत आहेत. त्यांनी आधी विधानसभेत गैरवर्तन केलं होतं, आता जाहीर कार्यक्रमात केलं, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

कोकण आणि साताऱ्यातील परिस्थिती पाहतोय. चिखलाचे डोंगर, मृत्यूचं थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काही करावं असं वाटतं नाही. कोट्यावधी रुपयांचे प्रोजेक्टच्या नावाखाली 16 वर्षात 3 लाख 20 हजार कोटीचा अर्थसंकल्प खर्च मुंबईकरांसाठी केला. मात्र खर्च करून चित्र काय.. तर तेच. मग हे पैसे गेले कुठे सत्ताधारी शिवसेनेला याचं उत्तर द्यावं लागेल, असं आशिष शेलारांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा

बॉसने दरडावल्याने तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

बसच्या छतावर शेकडो लोक, ड्रायव्हरने लावला ब्रेक अन्…, पाहा व्हिडीओ

“ओबीसी आरक्षणाबद्दल केंद्राला किती राग आहे, ते दिसतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More