“खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार”
नंदुरबार | राज्यातील सरकारचं वर्णन खावाले काळ नी भूईले भार असंच करावं लागेल, असं म्हणत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर सरकारवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शेलारांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.
मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. मग त्यांनी शब्द फिरवला का? याआधी तौक्ते आणि निसर्ग वादळावेळी घोषित केलेलं पॅकेज अद्याप जनतेपर्यंत पोहोचलं नाही. तातडीची 10 हजाराची मदत मिळालेली नाही, असं शेलारांनी सांगितलं.
घोषित होतं पण पोहोचत नाही, असं ठाकरे सरकारच पॅकेज असतं. या संकटाची व्याप्तीही अजून सरकारच्या लक्षात आलेली नाही. जनतेला मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे, असं आशिष शेलार म्हणाले.
एका अभद्र युतीतून कंत्राटावरचं कट कमिशनसाठी एकत्र आलेले हे तीन पक्षांचं ठाकरे सरकार आहे. जे गेल्या दोन वर्षात मंत्रालयात ही पोहचू शकलं नाही. जे अजूनही मंत्रालयात पोहोचलं नाही. ते नंदुरबारसारख्या अतीदुर्गम भागात कधी आणि कसं पोहोचणार?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक!
भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला मोठा धक्का! पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड
दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी
‘एक चांगला कलाकार बनून सेटचा निरोप घेत आहे’, अक्षय कुमारच्या पोस्टनंतर चाहते भावूक
Comments are closed.