महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत- आशिष शेलार

मुंबई | भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेस नेते म्हणतात, श्रेष्टींनी ठरवलं तर आम्ही महापौर बसवू, क्रॉफर्ड मार्केटमध्ये एखादा आयटम विकत घ्यावा, असं काही निवडणुकीतील पद आहे का? इतक्या सहजपणे मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकता येत नाही, असं आशिष शेलार म्हणालेत.

संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत. त्यामुळे त्यांचं विधान आता जनताही गांभीर्याने घेत नाही. तीन काय, तीस काय वाटेल ते आकडे बोलतायत, अशी बोचरी टीका शेलारांनी केली आहे.

काँग्रेसने आत्मपरिक्षण करावं. आधी आपल्याकडे लोक आहेत का, कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत का, काही मतदार शिल्लक राहिले आहेत का? याचा विचार करावा. बरं हे आम्ही म्हणत नाही तर तुमच्यासोबत जे सत्तेत बसले आहेत ती शिवसेना म्हणत आहे. तुमच्यासोबत मतदार राहिले नाही. तुमचे नेते राहुल गांधी आता बिनकामाचे झाले ही शिवसेनाच म्हणते, असा टोला शेलारांनी लगावला.

ही महाविकास आघाडी नैसर्गिक आलायन्स नाही. त्यांच्या भांडणात आम्हला रस नाही. पण त्यांच्या भांडणामुळे विकासाला खीळ बसतेय. हे सरकार आपआपसातल्या विसंवादामुळे पडेल. पण तोपर्यंत लोकांचं नुकसान खूप होईल, याची आम्हला चिंता आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा हे भाजपचे षडयंत्र”

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचं निधन

“मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?”

ब्रिटनमधील ‘स्ट्रेन’चा एकही रुग्ण राज्यात नाही- राजेश टोपे

“डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या