“नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या”
मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमधील तणाव दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. भाजपच्या रथाची तोडफोड झाल्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य करताना मुंबई महापालिकेच्या कारभारावर देखली बोट ठेवलं आहे.
गेल्या 25 वर्षात शिवसेनेनं मुंबईचं मोठं नुकसान केलं आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय करण्यात आला आहे. शिवसेनेनं मुंबईकरांना हिशोब द्यावा, असंही शेलार म्हणाले आहेत. जे दगडफेक करत आहेत. त्यांना शेलार यांनी खुलेपणानं आव्हान दिलं आहे. तारीख आणि वेळ तुमची दोघंही एकत्रित अभियान राबवू, असं शेलार म्हणाले आहेत.
नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या, पोलिसांनी अगोदर या नामर्दांवर कारवाई करावी, असं शेलार म्हणाले आहेत. मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाचं यश आम्हाला बघायचं आहे. कटामागं कोण सुत्रधार आहेत हे समोर आलं पाहिजे, असंही शेलार म्हणाले आहेत. शेलार यांनी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
दरम्यान, जर दगडफेकीला जशास तसं उत्तर दिलं तर परिस्थितीला जबाबदार हे सरकार असेल, असं शेलार म्हणाले आहेत. परिणामी महाविकास आघाडी आणि भाजपमधील वादाला आता नव्यानं सुरूवात झाली आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! नवाब मलिकांना ईडीकडून जोर का झटका
“ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत आणि म्हणूनच ते…”
रूसलेल्या नवरदेवाची अजब-गजब मागणी ऐकून सासरेबुवाही चक्रावले
“केंद्र सरकारने अख्खा देशच उद्योगपतींना विकला आहे”
IPL 2022| कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.