संजय राऊतांनी गजनी सिनेमा पहावा, आशिष शेलारांचा खोचक सल्ला
मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या नावाने राज्यात वादंग निर्माण केले. शिवसेना फोडली आणि भाजपसोबत संयुक्त युती करत मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पूर्वीचाच भाजप शिवसेना वाद आणखी चिघळला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज 16 दिवस होऊनही त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanay Raut) यांनी भाजपला आणि शिंदे सरकारला धारेवर धरले आहे.
संजय राऊतांनी हे सरकार बेकायदेशीर आहे असे म्हंटले आहे. त्यात त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्यपाल आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात असा त्यांनी आरोप केला आहे. तसेच त्यांनी प्रा. हरी नरके (Prof. Hari Narke) यांच्या ट्विटचा आणि भारतीय राज्यघटनेचा दाखला देत, मंत्रीमंडळात किमान बारा मंत्री असल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नसल्याचे म्हटले आहे.
यावर आता भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत हे चित्रपट निर्माते असल्याने त्यांना माझा सल्ला आहे की, त्यांनी गजनी (Ghajni) चित्रपट पहावा. ज्यांना विसरण्याची सवय असते अशा सर्व पिडीतांनी गजनी चित्रपट पहावा, असे शेलार म्हणाले. तसेच जेव्हा मविआचे सरकार होते, तेव्हा 32 दिवस किती मंत्री होते? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.
दरम्यान, यात संविधानिक स्पष्टता अतिशय महत्वाची आहे. घटनेत ज्या मर्यादा स्पष्ट केल्याचा दाखला राऊत देत आहेत, त्या छोट्या, उदा: गोव्यासारख्या राज्यांसाठी आहेत, असेही यावेळी शेलार म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
मुंडे बहिण-भावांमध्ये जुंपली, श्रेयवादासाठी चढाओढ
भाजपच्या मध्यस्तीमुळे शिंदे-ठाकरेंची भेट होणार?, शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ
‘शिंदे-फडणवीस हा फेव्हिकॉलचा जोड त्यामुळे…’, स्नेह भोजनात आमदारांना सूचना
‘…अन् त्यानंतर मी एकदाही उद्धव ठाकरेंशी बोललो नाही’, उदय सामंत स्पष्टच बोलले
उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनगड यांना उमेदवारी, शेतकरी पुत्राबद्दल जाणून घ्या सर्वकाही
Comments are closed.