Top News

“पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी”

मुंबई | राज्यातील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात संशोधन होण्याची गरज आहे. तसेच राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी आशा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी आशिष शेलार बोलत होते.

जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं, असं शेलार यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात मोठ्या पदावर बरीच लोक बसली आहेत. पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती या महाराष्ट्रात कमी दिसतात. मला तुलना कुणाशी करायची नाही पण अशा व्यक्ती कमी आहे, अशी खंतही शेलार यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार!

वीजबील माफीवरून मनसे आक्रमक, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फूटांचा पुतळा जाळणार!

भारतात फेब्रुवारीपासून कोव्हिशील्ड लसीच्या वितरणाला सुरुवात; ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार लस

‘अमृता फडणवीसांच्या गाण्याचा आशय सुंदर’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून कौतुक

“माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या