मुंबई | औरंगाबादच्या नामंतराच्या मुद्यावरून शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा “उखाड दिया” ची भाषा आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत”! सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!, असं शिवसेनेच्या अग्रलेखात म्हटलं होतं.
दरम्यान, आशिष शेलारांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
“आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय, ‘आपल्यासाठी संभाजीनगर आणि संभाजीनगरच राहणार’”
कंपाऊंडर डोक्यावर पडलेत का?- संदीप देशपांडे
“धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता”
शार्दुल आणि वाशिंग्टनने केली कांगारूंची बोलती बंद! सुंदरने केला 110 वर्षानंतर ‘सुंदर’ विक्रम
‘बिग बॉस14’ मधील पिस्ता धाकडचा व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून मृत्यू