सांगली | स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. सांगलीमध्ये किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
सत्तरच्या दशकात आलेल्या पिंजरा या चित्रपटातील आदर्श शिक्षकाला एका मोहापायी तमाशाच्या फडात तुणतुण घेऊन उभं रहाव लागतं. तशी अवस्था राजू शेट्टींची झाली असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे.
विधान परिषदेच्या आमिषापोटी शेतकऱ्यांचा नेतृत्व करणारे राजू शेट्टी आडतदार, दलालांसाठी महाविकास आघाडीच्या बाजुने तुणतुणे घेऊन उभे राहून त्यांची वकिली ते करत असल्याचं शेलार म्हणाले. त्यामुळे शेलारांनी केलेल्या या टीकेवर राजू शेट्टी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या ‘किसान आत्मनिर्भर यात्रे’च्या पार्श्वभूमीवर ‘कोणीही आमच्या बालेकिल्ल्यात आले तरी काही फरक पडणार नाही, असा टोला शेट्टी यांनी लगावला होता.
थोडक्यात बातम्या-
जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस; 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
अंबानी पुत्राचा नामकरण सोहळा; आकाश-श्लोकाच्या मुलाचं ठेवलं ‘हे’ नाव
त्रास होत असल्यास शिवसेना सोडून भाजपमध्ये या; राजन साळवी यांना खुलं निमंत्रण
…तर फडणवीस-मोदींशी चर्चा करून तोडगा काढू’; ‘या’ माजी मंत्र्याने अण्णांना केली विनंती