बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये फाळणीच्या स्मृतीदिनाबाबत लिहिलेल्या अग्रलेखावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधत सामनाचं नाव बदलावं असं म्हटलं आहे.

‘फाळणीचा दिवस विसरू नका, असं फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलं. मात्र पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधीजींनाच ठरवून नथुरान गोडसे यांनी गोळ्या घातल्या. मात्र महात्मा गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर आज  फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती, असं संजय राऊत यांन आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

भारतीय लोकांच्या फाळणीच्या आठवणींना एका अर्थाने इतिहासातून धडा घेऊन नवा इतिहास घडवण्यासाठीचा तो दिवस पंतप्रधान मोदींनी घोषित केला. तर पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागलं मात्र जे पाकिस्तानच्या पोटात दुखलं तशाच भावना संजय राऊतांच्या हातातून उतरल्या. त्यामुळे सामनाने आता नाव बदलून टाकायला हवं आणि सामनाने त्यांचं नाव पाकिस्तान किंवा बाबरनामा ठेवायला हवं, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी कितीही प्रयत्न केला तरी या देशाचा वेगळा इतिहास लिहण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना त्यांनी बळ देण्याचा हा प्रयत्न आहे. जीना यांनी फाळणी केली याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही, असंही शेलार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“भाजप लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे, राणेंना प्रसिद्धीचा मोह”

उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकरांना मोठा धक्का, बंगला तोडण्याचं काम सुरु!

भाजप प्रवेशासाठी राणेंनी दिलेल्या खुल्या ऑफरवर एकनाथ शिंदेंनी सोडलं मौन; म्हणाले…

“श्रीरामाचा भक्त येतोय, श्रीरामांनी त्यांना चरणापाशी जागा द्यावी”

“रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट, मोदींना बैल म्हणणं हा पंतप्रधानपदाचा अपमान”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More