बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही- आशिष शेलार

पुणे | सध्या राज्यातील सर्व पक्ष स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. महापालिकेच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी कामाला सुरूवात केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचा महापौर होणार असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी गाय, बैल होत नाही, असं आशिष शेलार म्हणाले. सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात असल्याचं म्हणत आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.  त्यासोबतच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली आहे.

पोलिसांकडून राज्यात वसुलीचं काम सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की स्वबळ असं करतात, कोण दिल्लीला जातं, तर कोण बैठक घेत आहेत. काहीजण सकाळी उठले की 108 वेळा स्वबळाचा मंत्र जपत असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, फोन टॅपिंगचा कारभार हा केंद्र सरकारचा नाही. असेल तर पुरावा द्यावा, नाही तर गप्प बसावं, असंही शेलार यांनी म्हणत सरकारवरला ताकीद दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”

…म्हणून मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही; पंकजा मुंडेंचं पुन्हा स्पष्टीकरण

“अहो संजय राऊत… निर्लज्जपणालाही काही मर्यादा असतात”

सामना हारल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षक आणि कर्णधारामध्ये भांडण??; पाहा व्हिडीओ

तलवारीने सपासप वार झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More