बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेलाच कुरतडलं”

मुंबई | मुंबईतील घाटकोपरच्या एका रूग्णालयात एका रूग्णाचे डोळे कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 80 हजार कोटीचं फिक्स डीपॉझिट, 1 हजार 200 कोटीच्या वर आरोग्याचं बजेट, मग या बजेटला कोण कुरतडत आहे?, असा सवाल करत हे पाप शिवसेनेचं असल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला आहे.

सामान्य माणसाचा जीव शिवसेनेने टांगणीला लावला असून सायन रुग्णालयात मृतदेहांच्या शेजारी रूग्णांवर उपचार केले जातात. तर राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उंदीर रुग्णांचे डोळे कुरतडत आहेत. ही मुंबई आणि महापालिकेची आजची स्थिती असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तात्काळ याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. रूग्णाच्या डोळ्याच्या पापण्यांचा व आजूबाजूचा भाग कुरतडला गेला आहे. याची पूर्णपणे चौकशी केली जाईल. ही गंभीर बाब आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, डोळे कुरतडलेल्या रूग्णाचं नाव श्रीनिवास यल्लपा असं असून वय 24 वर्ष आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्यानं दाखल केलं होतं. त्याला मेंदूज्वर, आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे दिसून आलं. याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितलं असता त्यांनी त्यांना उद्धट उत्तरं दिल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“केंद्रातील मोदी सरकार घालवल्याशिवाय देशातील शेतकऱ्यांसह, कष्टकऱ्यांचे अच्छे दिन येणार नाही”

कंगना रणौतनं केली देशाचं नाव बदलण्याची मागणी, म्हणाली….

“2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”

‘…अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

लॉकडाउनमुळे रिचार्ज न करू शकणाऱ्यांना ‘या’ कंपनीकडून मिळणार मोफत रिचार्ज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More