बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताईंसारखी “वाघा”ला साजेशी भूमिका घ्या!”

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गेल्या दोन आठवड्यांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र यावर संजय राठोडांनी आपली भूमिका मांडताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोशल माध्यमांवर काही फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलारांनीही सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आम्ही “वाघ” आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताई वाघ यांच्या सारखी “वाघा”ला साजेशी भूमिका घ्या!, असं  भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच आमच्यासाठी नको पण तमाम महाराष्ट्रातील माता, भगिनींसाठी तुमचे मौन सोडा! वनमंत्र्यांच्या प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या!, असा सल्ला आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

संजय राठोड यांनी या प्रकरणावर पोहरादेवी येथे पत्रकार परिषद घेत विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीची पाहणी केली. पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली. चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.

दरम्यान, मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील. मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वासही चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

 

थोडक्यात बातम्या-

“दोन मिनिटाच्या भेटीत बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही”

‘पबजी लव्ह स्टोरी’; पबजी खेळत असताना जडलं प्रेम, विवाहित महिला झाली बेपत्ता त्यानंतर….

आत्महत्या करण्यासाठी तीने आईस्क्रीममध्ये विष मिसळलं, मात्र त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

पत्नी म्हणजे मालमत्ता नाही- मुंबई हायकोर्ट

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहिणीचा पतीसह अपघाती मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More