Top News महाराष्ट्र मुंबई

“आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड आहे, यांनी राज्याला बिघडवू नये”

मुंबई | राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीवर सर्वांच लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

युतीमध्ये लढल्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये नेहमी शिवसेनेचा महापौर झाला. यापुढे शिवसेना आणि भाजप वेगळी निवडणूक लढणार असल्याने राज्यातील सर्व महापालिकांवर भाजपचाच महापौर निवडून येणार असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड आहे. ही बिघडलेली आघाडी आहे. यांनी राज्याला बिघडवू नये एवढीच आमची इच्छा आहे असं म्हणत शेलारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, फोडाफोडीचे राजकारण किती केलं तरी दुर्बलाला बळाचं बळ कधीच मिळू शकत नसल्याचं शेलार म्हणाले. आम्ही स्वबळावर लढणारे आहोत. ते तिघेही दुर्बल असल्याची टीकाही शेलारांनी केली.

थोडक्यात बातम्या-

“सामनात किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही त्यासाठी…”

ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! भारताच्या ‘या’ खेळाडूंवर वर्णद्वेषाची टीका, तक्रार दाखल

‘मुख्यमंत्र्यांनी शहरांची नाव बदलण्यावर जोर देण्याऐवजी सरकारी दवाखान्यांकडे …’; काँग्रेस नेत्याचा ठाकरेंवर निशाणा

“बाळासाहेबांच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं”

या आईचा हंबरडा तुमच्या काळजाचं पाणी पाणी करेल का???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या