Top News महाराष्ट्र मुंबई

“भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय”

सिंधुदुर्ग | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिधुदुर्ग दौऱ्यानंंतर भाजपला कोकणाता मोठा धक्का बसला आहे. वैभववाडीत भाजपच्या सात नगरसेवकांनी तडकीफड राजीनामा दिला असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवी मुंबई आणि कोकणात भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय, असं म्हणत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यासोबत गेलेले नगरसेवक पश्चातापवतील असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

ज्यांना तिकीट मिळण्याची अपेक्षा कमी होती किंवा नव्हती आणि समोर सत्तेत असलेल्या शिवसेनेने सत्तेचा दुरूपयोग केला असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

दरम्यान, आशिष शेलारांच्या या टीकेवर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

टाटा देतंय भन्नाट ऑफर!! आता 80 हजारात आणा ही कार..

“पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता, मनसेवाले टप्प्यात आणून करतात

आता मोदींनाच विचारायला हवं खरे मोदी कोण?- छगन भुजबळ

“कधी-कधी वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसची खरी गरज”

सचिन आणि लता मंगेशकर यांचा महाराष्ट्र सरकारला अभिमान वाटला पाहिजे- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या