बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या पक्षाला उघडं करण्याचं काम भाजप करणार’, अदर पूनावाला प्रकरणात आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट

मुंबई | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपल्याला धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. टाइम्स या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यामध्ये त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. या प्रकरणाबाबत भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अदर पुनावाला यांना आताच्या काळात सुरक्षा का मागावीशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. दिशादर्शन जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्या पक्षाला उघडं करण्याचं काम परिस्थिती निवळल्यानंतर भाजप करणार आहे. माझ्याकडे आणि पक्षाकडे याची माहिती आहे. त्यावर आज भाष्य करणार नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावं, आमच्याकडे माहिती येत आहे, असा इशाराही शेलारांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटात आज आम्हाला राजकारण करायचं नाही. लोकांची सेवा करणं भाजपने धोरण आखलं आहे. केंद्र सरकारने पुनावाला यांना सुरक्षा पुरवत आपलं काम चोख केलं असल्याचं आशिष शेलार म्हणाले. यावेळी शेलांरानी पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निकालावरही भाष्य केलं.

दरम्यान, भाजपला पुर्ण विजय मिळवता आला नसला तरी यशाचं मोजमाप करायचं झाल्यास यशाचा पगडा भाजपकडेच आहे. कम्युनिस्ट रसातळाला गेले, काँग्रेसचं बाष्पीभवन झालं. ममता बॅनर्जी यांची म्हणावी तशी वाढ झाली नसल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“…म्हणून पाटलांना कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला”

“पराभवाची सवय करून घेतली पाहिजे, कारण आता वारंवार फटके बसणारेत”

“धमकी कोण देतंय उघड झालंच पाहिजे, पुनावालांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल”

अदर पुनावालांनी मागणी केली नसताना त्यांना सुरक्षा का पुरवली- नाना पटोले

जावई आणि सासू प्रेमसंबंधामुळे आले पळून, मात्र पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More