बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुमची इयत्ता कंची ?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई | यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर मुलांना गुण देण्यात आले. त्यानंतर 11 वी परीक्षेसाठी सीईटी म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल, असं राज्य सरकाराने सांगितलं होतं. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने घेण्यात येणारी सीईटी परीक्षा अखेर रद्द केली आहे. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

अकरावी प्रवेश परीक्षा रद्द करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय अनियंत्रित, अवास्तव, कठोर, भेदभाव करणारा, लहरी आणि घटनेत दिलेल्या समानतेच्या हक्काचं उल्लंघन करणारा आहे, असं म्हणत न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं. ‘छडी लागे छम छम आणि विद्या येई घम घम’ अशी चंपी राज्य सरकारची केली अशी टीका शेलारांनी केली आहे.

ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, अशी टीका देखील शेलारांनी केली आहे. वारंवार आम्ही अनेक बाबी सरकारच्या लक्षात आणून दिल्या. न्यायालयाने देखील फटकारलं. तरी देखील हे लहरी सरकार काहीही शिकलं नाही. शिक्षणाचा हा अभूतपुर्व घोळ घालणाऱ्या या ठाकरे सरकारला तुमची इयत्ता कंची?, असं विचारावं वाटतं, असंही शेलार म्हणाले.

दरम्यान, 11वी प्रवेशासाठी 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. त्यासंंबंधी सरकारने 28 मे रोजी एक जीआर देखील काढला होता. याच जीआरवर सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती रमेश धनुका आणि न्यायमुर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठानं प्रवेश परीक्षा अखेर रद्द केली होती.

थोडक्यात बातम्या

आनंदाची बातमी! ‘या’ महिन्यात येणार लहान मुलांसाठीची कोरोना प्रतिबंधक लस

सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात, हैदराबादमध्ये उपचार सुरु

“मी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलंय, मला बोलू द्यायचं की नाही हे त्यांनी ठरवावं”

भाजपसोबत सोन्याच्या ताटात जेवताना…; प्रीतम मुंडे, नवनित राणांचा शिवसेनेवर घणाघात

स्वपक्षातील खासदारामुळे भाजप अडचणीत, ‘या’ एका मागणीनं विरोधक आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More