बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरेंचा Dream Project वादात; भाजपने केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

मुंबई | देशाच्या अर्थकारणाची नाडी म्हणून मुंबई शहराला (Mumbai City) ओळखण्यात येतं. मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची (Shivsena) एकहाती सत्ता आहे. भाजपकडून (BJP) या सत्ताकेंद्राला हादरे देण्याचे अनेक प्रयत्न होतं आहेत. अशातच मुंबईच्या वाहतुकीचा ताण कमी करणारा कोस्टल रोड प्रकल्प (Coastal Road Project) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thakeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

कोस्टल रोडच्या कामात मोठी अफरातफर झाली असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पामध्ये अनागोंदी कारभार चालला आहे. कोणालाही कसलाही पत्ता न लागू देता पालिका प्रशासन जनतेचा पैसा वाटोळा करत आहे. कॅगच्या अहवालात मुंबई कोस्टल रोड या सरकारच्या योजनेवर तोशेरे ओढण्यात आली आहेत. याला सर्वस्वी जबाबदार आदित्य ठाकरे आहेत, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

मुंबई कोस्टल रोडला मान्यता देताना ज्या अटी आणि शर्थी केंद्र सरकारनं घालून दिल्या होत्या त्या पाळण्यात आल्या नाहीत. वाहतुकीचं निरीक्षण योग्य पद्धतीनं करण्यात आलं नाही. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावीत, असं शेलार यांनी म्हटलं आहे. परिणामी सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पावर टीका झाल्यानं शिवसेनेकडून शेलार यांना घेरण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीनं कोस्टल रोड हा प्रकल्प फार महत्त्वाचा आहे. देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई ही जगाच्या प्रमुख आकर्षणाचं केंद्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात या कोस्टल रोडवरून चांगली जुंपणार आहे.

थोडक्यात बातम्या 

omicron हवेतून पसरतोय?; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

‘…हे कदाचित कोरोना संपल्याचं लक्षण असेल’; आनंद महिंद्रांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून किती दिवस माफी मागणार?”

‘लग्नाचं फुटेज द्या, 100 कोटी घ्या’; विकी-कतरिनाला सर्वात मोठी ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More