बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे- अशोक चव्हाण

मुंबई | मराठा आरक्षणावरून राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये मोठा वाद पेटलेला दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चव्हाणांवर टीका केली होती. या टीकेला अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

सत्ता गेल्याचं नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भांडाफोड झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल वक्तव्ये करत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

भाजपला सत्ता गेल्याचं नैराश्य होतंच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भांडाफोड केल्याने पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमकं काय बोलावं हे कळेनासं झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटत आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे,  असंही अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

काय सांगता! ओम, ओम म्हणत चितेवरच उठून बसला मृतदेह अन्….

“महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही”

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

सर्व केंद्राने करायचं मग राज्याने माशा मारायच्या का?- देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला चंद्रकांत पाटलांनी भरला दम; म्हणाले, औकातीत रहावं…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More