नांदेड महाराष्ट्र

“त्यांना वाटलं की संधी आली अशोक चव्हाणला ठोका, पण…”

नांदेड | गेल्या 24 वर्षांपासून साखर कारखान्याच्या विरोधकांना बोलायला संधी मिळाली नाही, मात्र आता त्यांना वाटलं की, संधी आली अशोक चव्हाणला ठोका, पण जनता माझ्या पाठीशी आहे. तुम्ही कितीही बोंबलत राहा, असं म्हणत अशोक चव्हाणांनी विरोधकांना सुनावलं आहे.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या 25व्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ झाला. या कार्यक्रमात मंत्री अशोक चव्हाण बोलत होते.

चव्हाण यांच्या कारखान्याकडे एफआरपीचे पैसे थकल्याने विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यावर टीका केली होती. याला अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे एफआरपीचे पैसे थकले, पण यावर्षी गाळप सुरू होण्याआधी शेतकऱ्यांचे 33 कोटी रुपये आम्ही दिले, असं अशोक चव्हाणांनी यावेळी बोलताना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

एक बाप म्हणून मी माफी मागतो, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही- कुमार सानू

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

“उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं, शरद पवारच सरकार चालवत आहेत”

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या