महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा कोणताही विचार नाही- अशोक चव्हाण

मुंबई | जनतेनं आम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला आहे. पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मात्र अद्याप शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसचा कोणताही विचार नाही, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. भाजप आणि शिवसेनेत जे काही घडतंय तो स्टंट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार स्थापन होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात घडत होत्या. आता त्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करू, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र अशोक चव्हाण यांनी पक्षाचा तसा विचार नसल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, शिवसेनेलाच नाही तर भाजपलाही आम्ही पाठिंबा देणार नाही, असं राष्ट्रवादीने याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आता मावळली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या