बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑक्सिजनसाठी अशोक चव्हाणांकडे 15 लाखांची मागणी; चव्हाणांचा थेट नितीन गडकरींना फोन

नागपूर | मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. देशभरात ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता आहे. कोरोना महामारीनं थैमान घातलं असताना नितीन गडकरी गरजू लोकांना ऑक्सिजन उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना लढाईचं नेतृत्व द्यावं, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच आता नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षातील नेत्याला रात्री 12 वाजता मदत केली आहे.

नांदेडला ऑक्सिजन पुरवठा करणारा एक टँकर विशाखापट्टणमच्या एका ट्रान्सपोर्टरने पळवून नेला. त्यामुळे नांदेडमध्ये सर्वत्र धावपळ उडाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना या घटनेची माहिती मिळाली. त्या ट्रान्सपोर्टरने अशोक चव्हाण यांच्याकडे 15 लाख रूपयांची मागणी केली. त्यानंतर यासंबंधी अशोक चव्हाण यांनी थेट गडकरींना फोन केला आणि झालेला प्रकार सांगितला.

अशोक चव्हाण यांचा आपल्याला फोन आला. त्या ट्रान्सपोर्टरने आपल्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केल्याचं चव्हाण यांनी नितीन गडकरींना सांगितलं. त्यानंतर त्याचे टँकर जप्त केले. मी रात्री 12 वाजता त्या ट्रान्सपोर्टरला फोन केला आणि मी त्याला दाब टाकला. त्याला सांगितलं हे बरोबर नाही. नाहीतर तुमच्यावर कारवाई करू, त्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु करण्यात आला, असं नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितलं.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी रविवारी भाजप नागपूरच्या महानगर कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीच्या समारोपावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे. त्यावेळी ते बोलत होते.

थोडक्यात बातम्या –

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना रूग्णांसाठी ‘हे’ प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात

अंगावर काटा आणणारा अपघात! गाडीची धडक झाल्यावर तरूण उडाला हवेत…, पाहा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More