बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपला मराठा आरक्षणाचं श्रेय हवं असेल तर…”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने राज्य सराकारला घेरलं होतं. त्यानंतर आरक्षणाचा चेंडू राज्याने केंद्राच्या पारड्यात टाकला होता. केंद्र सरकारने नुकतंच 127 वी घटना दुरूस्ती करत आरक्षणाचा चेंडू पुन्हा राज्यांच्या पारड्यात टाकला आहे. नुकतीच या घटनादुरूस्तीला लोकसभेची मान्यता मिळाली. त्यानंतर आता लोकसभेत मंजुर झालेल्या या घटनादुरूस्तीवर मराठा आरक्षण मंत्री समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा होता. मात्र, भाजपचे खासदार त्यावेळी गप्प बसले होते. भाजप खासदारांपैकी कोणीही त्यापैकी बोललं नाही. ही दुर्देवाची बाब आहे, अशी खंत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा काढून टाकण्याची सुवर्णसंधी गमावली आहे. केंद्र सरकारने ही संधी का सोडली हे कळलं नाही, असंही ते म्हणाले आहेत.

अनेक खासदारांनी लोकसभेत संसदेत 50 टक्के आरक्षण शिथील करण्यात यावं अशी मागणी मांडली होती. पण केंद्र सरकारने या सर्व मागण्या फोटाळून लावल्या. आता राज्यसभेत तरी या विषयावर सरकारकडून सकारात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकरणावर भाजपचे मराठा खासदार गप्प का?, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

भाजपला जर मराठा आरक्षणाचं श्रेय हवं असेल तर, आम्ही भाजपला श्रेय देण्यास तयार आहोत. पण भाजपने मराठा आरक्षणाची अडवणूक करू नये, अशी टीका देखील अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली आहे. लोकसभेत गोंधळाच्या स्थितीत हे घटनादुरूस्ती विधेयक पार पडलं. भाजपने खासदारांना व्हिप जारी केला होता. त्यानंतर केंद्र सरकार महत्त्वाचे विधेयक मांडणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

घरची गरिबी, वडिलांचा पानाचा ठेला, पण क्रिकेटचा नादच बेक्कार, आता थेट इंग्लंड दौऱ्यावर!

बालाजी तांबेंच्या ‘या’ तक्रारीमुळे बाळासाहेब ठाकरेंनी हातात घेतली होती काठी, वाचा थोडक्यात किस्सा!

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून शाळेची घंटा वाजणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More