कोरेगाव भिमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

मुंबई | कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. सरकारची या सगळ्या प्रकाराला मूकसंमती होती काय? असा सवालही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

राज्यातील एकूण परिस्थितीबाबत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यावर काँग्रेस नेत्यांचं एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं.