राज्य सरकारची स्थिती भरकटलेली, पुढील वर्षी मध्यावधी निवडणुका होणार!

राज्य सरकारची स्थिती भरकटलेली, पुढील वर्षी मध्यावधी निवडणुका होणार!

कोल्हापूर | राज्यात सध्याचं वातावरण बघता, पुढील वर्षी मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन लढणार, असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

राज्य सरकारची अवस्था भरकटल्यासारखी झालीय. गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बरेच बदल होण्याची शक्यता आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

भाजपच्या पराभवासाठी दोन्ही काँग्रेसनं एकत्र येणं आवश्यक आहे. त्यामुळे वरीष्ठ पातळीवर एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालीय, असंही त्यांनी सांगितलं.

 

Google+ Linkedin