बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारने निर्लज्जपणाचा कळस केलाय- अशोक चव्हाण

मुंबई | पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंवर मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह जाहिरातबाजी करण्यात आली आहे. यावर सरकारचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरातबाजी कुठे आणि केव्हा करायची याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. एक तर सरकार वेळेवर पूरग्रस्तांपर्यंत पोहोचू शकलं नाही. आता मदत सुरू झालीय तर त्यातही राजकारण केलं जातंय, जाहिरातबाजी केली जातेय, असं ट्वीट चव्हाण यांनी केलं आहे.

सरकारची प्राथमिकता कशाला? तर स्टिकर छापायला… असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केेलं. तर आता अंत्ययात्रा थोड्या थांबून काढा कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत, असं ट्वीट  आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान, सरकारने केलेल्या या जाहिरातबाजीवर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महापुरामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरे यांची मागणी

-अखेर राज्य सरकारनं तो वादग्रस्त निर्णय बदलला; आता पूरग्रस्तांना मिळणार रोख मदत!

-#सेल्फिशसरकार | शोबाजीपायी लोकांना उपाशी माराल- धनंजय मुंडे

-धक्कादायक!!! दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर मुख्यमंत्री आणि आमदाराचं ब्रँडिंग

-आता अंत्ययात्राही थांबून काढा, कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत- जितेंद्र आव्हाड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More