औरंगाबाद | लोकांना दोनवेळचं अन्न खायला मिळत नाही, तिकडं मोदी म्हणतात योगा करा, अशी जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, लोक किड्या-मुंग्यासारखी मरतायेत पण सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
पेरणी तोंडावर आली तरी शतेकऱ्याला अजून पीक कर्ज मिळत नाही, पीक विम्याचे पैसे देखील मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नितिश कुमारांनी फिरवली पाठ
-भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी
-पंतप्रधानांच्या घरी हलला पाळणा!
-भय्यू महाराजांना जवळच्या व्यक्तीनेच दिला धोका?
-भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवारांना टोला